Nasrapur Case : 'फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ, त्याला...'; भीमराव कांबळेच्या पत्नी-मुलाचा आक्रोश 

भीमराव कांबळे याची पत्नी आणि मुलाने पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य पाटील, प्रतिनिधी

Pune News :  पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. एक चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करीत तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान भीमराव कांबळे याची पत्नी आणि मुलाने पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना दोघांनीही आपला संताप व्यक्त केला. 

पतीच्या क्रूर कृत्याविषयी बोलताना महिलेचा संताप...

जिथं त्या बाळाची हत्या केली, त्याच जागेवर त्याला ठेचून मारा अशी भावना भीमराव कांबळे यांच्या पत्नी आणि मुलाने व्यक्त केली. भीमराव कांबळे याला जिवंत जाळा असंही त्यांची पत्नी यावेळी म्हणाली. आपल्या पतीच्या क्रूर कृत्याविषयी बोलताना त्या ओक्साबोक्शी रडत होत्या. गेल्या दहा वर्षांपासून दोघांचाही भीमरावशी संबंध नाही. राज्यभरातून भीमरावच्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या पत्नी आणि मुलानेही याविषयी आपला राग व्यक्त केला. भीमराव याची पत्नी पुढे म्हणाली, मला त्याचं तोंड देखील पाहायचं नाहीये, त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कोणी सांगायला पण येऊ नका. फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळला पाहिजे.

Advertisement

नक्की वाचा - Nasrapur Case : 'तुमची केस माहिती आहे का?' नसरापूर घटनेतील नराधम आरोपीचा कोर्टात संतापजनक दावा

आरोपी भीमरावच्या मुलानेही बापाच्या कृत्याबद्दल रोष व्यक्त केला. भीमराव कांबळेला वडील म्हणून घायची लाज वाटतेय. त्याच्या पोटी मी जन्म घेतला हाच माझा गुन्हा आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Topics mentioned in this article