यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करीत तिला जीवे मारण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात ६५ वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित चिमुरडीच्या कुटुंबासह राज्यभरातून केली जात आहे. दरम्यान आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याने जो दावा केला ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
पोलिसांनी अटक केल्यानंतर भीमराव कांबळे याने आपला गुन्हा कबुल केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता नसरापूर घटनेतील नराधम आरोपीने कोर्टात संतापजनक दावा केला आहे. न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला काही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे ऐकून पोलिसही हैराण झाले आहे.
आरोपीचा कोर्टात अजब दावा...
न्यायाधीशाने विचारलेल्या प्रश्नावर आरोपी भीमराव कांबळे म्हणाले, मला किरकोळ मारामारीसाठी गोवण्यात आलं आहे. यावरुन आरोपी न्यायालयात स्वत:चा बचाव करीत असल्याचं दिसून येत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोपीने संतापजनक उत्तर दिलं. पुढे न्यायालयाने आरोपीला विचारलं...तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का? यावर आरोपी म्हणाला, सर ही मारामारीची किरकोळ केस आहे. त्यात मला गोवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. पोक्सोची संवेदनशील केस असल्यामुळे प्रसारमाध्यमांना कोर्टात सुनावणी दरम्यान हजर राहण्यास मनाई करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world