जाहिरात

छातीवर वळ...नराधमाने क्रूरतेची सीमा ओलांडली! नसरापूरच्या चिमुकलीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचून अंगावर येईल काटा

Nasrapur Crime News: नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी भीमराव कांबळेने क्रूरतेची सीमा ओलांडली.

छातीवर वळ...नराधमाने क्रूरतेची सीमा ओलांडली! नसरापूरच्या चिमुकलीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचून अंगावर येईल काटा
"Nasrapur Crime News: नसरापूर बलात्कार प्रकरण, चिमुकलीच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर"
NDTV Marathi
  • नरसापूर प्रकरणातील चिमुकलीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून थरकाप उडवणारा खुलासा
  • चिमुकलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा-सूत्र
  • भीमराव कांबळेने चिमुकलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचे समोर
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Nasrapur Crime News: पुण्यातील नसरापूर परिसरात एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने माणुसकीला काळीमा फासला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीचा किती निर्दयीपणे छळ केला, याचा खुलासा आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून (Post-Mortem Report)  झाला आहे. 

आवाज दाबण्यासाठी तोंडात कोंबला बोळा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम भीमराव कांबळे याने चिमुरडीवर अत्याचार करताना ती ओरडू नये आणि तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. तिला निर्दयीपणे मारहाण देखील केली. हा खुलासा समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या निष्पाप मुलीने शेवटच्या क्षणापर्यंत जो संघर्ष केला, त्याचे पुरावे तिच्या शरीरावर आढळून आले आहेत. 

(नक्की वाचा: Nasrapur Case : 'फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ, त्याला...'; भीमराव कांबळेच्या पत्नी-मुलाचा आक्रोश)

अंगावर जखमा आणि छातीवर गंभीर वळ

शवविच्छेदन अहवालात चिमुरडीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. विशेषतः तिच्या छातीवर गंभीर वळ आढळून आले आहेत. यावरून आरोपीने तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे. चिमुरडीचा मृत्यू नेमका गुदमरून झाला की आणखी काही अन्य कारण आहे? हे शोधण्यासाठी तिचे व्हिसेरा (अंतर्गत अवयवांचे नमुने) राखून ठेवण्यात आले आहेत.

(नक्की वाचा : POCSO Case:...तर ते लैंगिक शोषणच, छत्रपती संभाजीनगरची गंभीर घटना! 13 वर्षांच्या पीडितेबाबत हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय)

ससून हॉस्पिटलमध्ये 'इन कॅमेरा' शवविच्छेदन

या घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पुण्यातील ससून हॉस्पिटलने शवविच्छेदन करण्याची संपूर्ण प्रक्रिया 'इन कॅमेरा' म्हणजेच व्हिडीओ रेकॉर्डिंगसह पार पाडली आहे. या माध्यमातून प्रकरणातील तांत्रिक पुरावे भक्कम करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सध्या या नराधमाविरोधात कडक कारवाईची मागणी होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com