Navi Mumbai Crime: टीप मिळताच सापळा! पोलीस बनले ग्राहक, लॉजवर पोहोचले अन् जे पाहिलं... नवी मुंबईत खळबळ

लॉज चालक करूनाकर शेट्टी यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणून लॉजचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. मॅनेजर अजय गोस्वामी याने बनावट ग्राहकाकडून ३,५०० रुपये स्वीकारल्याचेही तपासात उघड झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Crime:  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तुर्भेनाका परिसरातील राज लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईत वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज घोरपडे यांना ३ जानेवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुर्भेनाका येथील राज लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.

Pune Crime News: व्याजाच्या पैशांसाठी शेतकऱ्याचं अपहरण; विवस्त्र करून बेदम मारहाण

बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला. या छाप्यात वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लॉज मॅनेजर अजय कैलास गोस्वामी, महिला पुरवणारा किशोर पूर्णचंद्र साहू, बेटर अजयकुमार हिरालाल साब आणि लॉज चालक करूनाकर शेट्टी यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणून लॉजचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. मॅनेजर अजय गोस्वामी याने बनावट ग्राहकाकडून ३,५०० रुपये स्वीकारल्याचेही तपासात उघड झाले.

३ आरोपी अटकेत

याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ३ आरोपींना ४ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली असून त्यांना ६ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

Advertisement

Pune Crime News: हॉटेलच्या आड सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकून केला पर्दाफाश

चौथा आरोपी लॉज चालक करूनाकर शेट्टी याचा शोध सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त श्री. धर्मपाल बनसोडे (AHTU, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास तुर्भे पोलीस ठाणे करत आहे.