Mumbai Crime: मद्यपी तरुणाचा हैदोस! पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, मुंबईतील संपाजनक प्रकार

थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात शिरकाव करत स्वतःला तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: नवी मुंबई सीबीडी बेलापूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, मद्यधुंद इसमाने पोलिस ठाण्यातच एका पोलिसाला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात शिरकाव करत स्वतःला तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पहाटे दीडच्या सुमारास सीबीडी सेक्टर 11 येथील मॅग्नम बार अँड रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घालण्यात आल्याची तक्रार सीबीडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे सतबीरसिंग संधू (वय 31) हा इसम अत्यंत मद्यधुंद अवस्थेत बारच्या मॅनेजरसोबत वाद घालत असल्याचे आढळून आले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संधू याने सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली होती. मॅनेजरने ती न दिल्याने त्याच्यात आणि संधू यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की संधूने थेट मॅनेजरला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Jalgaon News: प्रफुल लोढाला अटक! हनिट्रॅपची पाळेमुळे जळगावपर्यंत? खडसेंच्या आरोपानंतर बडा नेता फसणार?

गोंधळ घालणाऱ्या संधू याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सीबीडी पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी चौकशीसाठी त्याला एका खुर्चीवर बसवण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याच्याशी चौकशी करत होते. मात्र, संधू हा चौकशीदरम्यान अधिक आक्रमक झाला आणि अचानक पोलिस नाईक अनिकेत घाडगे यांच्यावर धावून गेला. त्याने त्यांना ठोसे मारले तसेच हातात असलेल्या लोखंडी कड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली.

हल्ला केल्यानंतर संधूने थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात प्रवेश केला आणि स्वतःला तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी त्याच्या पाठीमागे धावले आणि बळाचा वापर करत त्याला बाहेर काढले. या सगळ्या झटापटीत काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिस नाईक अनिकेत घाडगे यांच्या तक्रारीवरून सतबीरसिंग संधू याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा गोंधळ घालणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Pune News: भोंदू ज्योतिष अखिलेश राजगुरुला अटक, पुण्यात 25 वर्षीय तरुणीचा धक्कादायक आरोप

त्यानंतर संधूला अटक करण्यात आली आहे. परंतु संधू पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. बेलापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलिस ठाण्याच्या आत घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मद्यधुंद व्यक्तीचा असा बिनधास्त आणि धोकादायक प्रकार, तोही कायद्याच्या रक्षकांवरच, हे अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.