जाहिरात

Navi Mumbai News: बाहेरून हॉटेल, आतमध्ये मात्र भलतेच धंदे! पोलिस धडकले अन् धक्कादायक वास्तव उघड

त्यांना यामध्ये जबरदस्तीने ओढण्यात आल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यांची ही चौकशी पोलिस करत आहेत.

Navi Mumbai News: बाहेरून हॉटेल, आतमध्ये मात्र भलतेच धंदे! पोलिस धडकले अन् धक्कादायक वास्तव उघड
  • नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा परिसरात मोठ्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे
  • हॉटेल अबोड इन लॉजमध्ये जबरदस्तीने देहव्यापारासाठी नऊ तरुणी ठेवण्यात आले होते
  • पोलिसांनी ग्राहक बनून मध्यस्थी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू आहे
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

देहव्यापाराच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) ही कारवाई केली आहे. तळोजा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी देहव्यापाराचं रॅकेट चालवलं  जात होते. त्याचेच समुळ उच्चाटन करण्यात आले. या कारवाईत वेश्या व्यवसायात अडकविण्यात तरुणींना ही सोडवण्यात आलं आहे. तर  लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातूनच हा सर्व व्यवसाय गजबजलेल्या ठिकाणी केला जात होता. 

पोलिसांना 18 जुलै रोजी तळोजा येथील 'हॉटेल अबोड इन, लॉजिंग अँड बोर्डिंग'मध्ये महिलांना ठेवून देहव्यापार सुरू होता. याची खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. खबऱ्याने दिलेली माहिती ही पक्की असल्याची पोलिसांना खात्री झाली. त्यानंतर त्यांनी थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्लॅन करण्यात आला. काही पोलिस हे साध्या वेशात ग्राहक बनले. शिवाय त्यांनी जे मध्यस्थी होते त्यांना ही गाठले. तिथून ते 'हॉटेल अबोड इन मध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे देहव्यापाराचे रॅकेट चालवले जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 

नक्की वाचा - Shocking news: मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना जरा सावधान! खेडजवळ घडलंय असं काही की, तुमच्या जीवाला धोका

त्यांनी तातडीने आपल्या अन्य सहकारी पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिले. शिवाय लॉजवर छापा टाकण्याचा सिग्नल ही दिला. संकेत मिळताच पथकाने लॉजवर छापा टाकला. त्यावेळचे तिथले दृष्य भयंकर होते. नऊ तरुण मुलींकडून जबरदस्तीने तिथे देहव्यापार करून घेतला जात होता. तिथे काही ग्राहक ही होते. हॉटेलच्या नावाखाली तिथे भलतेच कारनामे सुरू होते.  या कारवाईदरम्यान नऊ पीडित तरूणींची सुटका करण्यात आली. त्यांना यामध्ये जबरदस्तीने ओढण्यात आल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यांची ही चौकशी पोलिस करत आहेत. 

नक्की वाचा - Viral Video: ते दरोडा टाकत होते, लोक Video बनवत होते! सशस्त्र दरोड्याचा LIVE व्हिडीओने खळबळ, कुठे घडलं?

तपासात लॉज व्यवस्थापक बलराम नंजय गोडा, वेटर गिरीश शेखर पुजारी आणि वेटर कृष्णराज रितेशकुमार पाटील हे महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच बनावट ग्राहकाकडून देहव्यापारासाठी तीन हजार रुपये स्वीकारल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिघांनाही 19 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून पुढील तपास करत असल्याचं एसीपी प्रेरणा कट्टे यांनी सांगितलं आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com