Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! बालदिनीच 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचा छळ,शिक्षकाने 5-6 वेळा थोबाडीत मारायला लावलं

Navi Mumbai: नवी मुंबईतील खासगी शाळेमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत अतिशय भयंकर प्रकार घडलाय, यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! शाळेतील भयंकर प्रकार"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

Navi Mumbai: सहा वर्षीय विद्यार्थ्याला त्रास दिल्याबाबत आणि छळ केल्याबाबत नवी मुंबईतील एका खासगी शाळेतील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शुक्रवारी (26 डिसेंबर 2025) याबाबतची माहिती दिलीय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कामोठे परिसरातील खासगी शाळेतील शिक्षकांविरोधात पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आलाय. 

विद्यार्थ्याचा छळ करू शिक्षक हसत होते

पालकांच्या तक्रारीनुसार, 14  नोव्हेंबर रोजी एका शिक्षकाने दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बोलावून मुलाच्या गालावर पाच ते सहा वेळा थप्पड लगावण्यास सांगितलं. यावेळेस शिक्षक कथित स्वरुपात मुलाचा सुरू असलेला छळ पाहत होते, इतकंच नव्हे तर त्याच्या परिस्थितीवर हसतही होते. 

पालकांच्या जबाबानुसार, 28 नोव्हेंबर रोजी इंग्रजी विषयाचा तास सुरू असताना आणखी एका शिक्षकाने कथित स्वरुपात त्याच मुलाला कंपास बॉक्स फेकून मारलं, यामध्ये मुलाच्या ओठाला इजा झाली.  

Advertisement

(नक्की वाचा: Thane Baby Selling Racket: नवजात बाळाची 6 लाखांना विक्री, 5 जणांना अटक; मुलं चोरणारी गँग हाती लागण्याची शक्यता)

शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

प्राथमिक तपासानंतर बुधवारी कामोठे पोलीस ठाण्यात बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची आणि शाळेच्या वातावरणाची चौकशी करत आहोत."

दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 
(Content Source : PTI)

Topics mentioned in this article