
प्रथमेश गडकरी
लग्न म्हटल्यावर लग्न घरात गडबड ही आलीच. पाहुण्यांची रेलचेल. कामाचा उरक. प्रत्येकाला भेटणे विचारपूस करणे या गोष्टी त्या बरोबर आल्याच. तर काहींवर दागिने सांभाळण्याची खास जबाबदारी दिली जाते. तर काहींवर स्वत:चेच दागिने सांभाळण्याची जबाबदारी असते. पण त्यात ही काही वेळ एक चुक महागात पडते. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. लग्न घरात एका चुकीमुळे काही क्षणात तब्बल 14 लाखाचे दागिने गायब करण्यात आले. पण यात खरा ट्वीस्ट नंतर आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाशी गावात हळदी समारंभासाठी आलेल्या पाहुण्याचे 14 लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. परेश पवार हे ठाण्याचे राहाणारे आहे. त्यांच्या भाचीचे लग्न होते. त्यासाठी ते ठाण्यावरून वाशी गावात आले होते. भाचीची त्या दिवशी हळद होती. हळद म्हटल्यावर मोठी गर्दी असणार हे त्यांना माहित होते. पण लग्न असल्याने ते ही बरेच दागिने घालून आले होते. पण रिस्क नको म्हणून त्यांना अंगावर घातलेले दागिने आपल्या गाडीत ठेवले.
त्यानंतर ते लग्न मंडपात आले. त्याच वेळी त्यांना आपल्या गाडीची चावी अनावधानाने मंडपातील टेबलवर ठेवली. ही चावी त्याच लग्नात आलेल्या अंकुश सरगरच्या हाती लागली. हा एक ओला ड्राव्हर आहे. हीच संधी साधत त्याने डाव साधला. त्याने परेश यांची गाडी खोलली. गाडीत असलेले 14 लाखाचे दागिने त्याने लंपास केले. दागिने हाती लागल्यानंतर त्याने तिथून धूम ठोकली. त्यावेळी परेश हे भाचीच्या हळदीमध्ये दंग होते. ज्या वेळी ते गाडीत परतले त्यावेळी त्यांना दागिने जागेवर दिसले नाहीत.
दागिने गाडीतून गायब झाल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने वाशी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तिथे त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे दिसले. त्याचे फुटेज त्यांना चेक केले. त्यात त्यांना अंकुश चोरी करताना दिसला. त्यानंतर साडे तीन तासात आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर त्याच्याकडून सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. हे दागिने पवार कुटुंबाला परत करण्यात आले. दागिने मिळाल्याने परेश यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world