ट्रॅफिक पोलिसांच्या मुजोरीने नवी मुंबईकर त्रस्त, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप!

वास्तविक पाहता, नियमांनुसार, कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी वाहनचालकांना दिसेल अशा ठिकाणी उभे राहणे अपेक्षित असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

नवी मुंबईतील ट्रॅफिक पोलिसांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या दादागिरीमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. प्रत्येक चौकात, ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहण्याऐवजी हे पोलिस झाडांच्या मागे, गाड्यांच्या आडून दबा धरून उभे राहतात. त्यानंतर अचानक गाड्यांसमोर उडी मारून लोकांकडून पैसे उकळतात असा आरोप आता नवी मुंबईकर करत आहेत. हे नियमित होत असल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वास्तविक पाहता, नियमांनुसार, कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी वाहनचालकांना दिसेल अशा ठिकाणी उभे राहणे अपेक्षित असते. शिवाय, आजच्या डिजिटल युगात ट्रॅफिक पोलिसांना मोबाईल अँपद्वारे नियम तोडणाऱ्यांचे फोटो काढून त्यांना ई-चलन पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. असं असताना ही या पोलिसांना असे दबा धरून वाहनांसमोर उडी मारण्याची गरज काय? असा प्रश्न आता नवी मुंबईतील जनता विचार आहे. या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ पैशांची वसुली करण्यासाठी होत आहे असा आरोपही थेट केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

या घटनांमुळे नवी मुंबईकर चांगलेच वैतागले आहेत. त्यांनी आपला संताप व्यक्त करताना, आम्ही कोणत्याही गुन्ह्याशिवाय दोषी ठरतोय. शिवाय रोज या भ्रष्ट ट्रॅफिक हवालदारांच्या तावडीत ही सापडत आहोत. अशा प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. या गोष्टी तातडीने थांबल्या पाहीजेत. सध्या शहरात 3500 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. असं असतानाही खुला आम ट्राफिक पोलिसांकडून वसुली सुरू आहे. शिवाय ते दिवसेंदिवस वाढत आहे. ई-चलनमुळे या हवालदारांचा खिसा गरम होत नाही, असा आरोपही नागरिक करत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?

याबाबत काही धक्कादायक माहिती ही समोर येत आहे. ट्राफिक हवालदारांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. वसुली केलेल्या पैशातील एक हिस्सा हा वरिष्ठांना दिला जातो. तर दुसरा हिस्सा सर्व हवालदार वाटून घेत असतात. या गोष्टी घडत आहेत. त्याची संपुर्ण कल्पना वरिष्ठांना असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. त्यामुळे अशा वसुली संस्कृतीच्या विरोधात नवी मुंबईकर जनता उभा ठाकणार आहे. दरम्यान अशा वसुली प्रवृत्तीच्या विरोधात गृह विभाग काही करावाई करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

एकीकडे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे नवी मुंबईतील जनतेला जास्तीत जास्त सुरक्षा, सायबर सुरक्षा, महिलांची सुरक्षा देण्याचे सांगत आहे.  नवी मुंबई गुन्हेगारीचे प्रमाण कसे नियंत्रणात  येतील यासाठी प्रयत्नशील आहेत. पण अशी वसुली रस्त्यावर सर्व सामान्यांची होत असेल तर कसे चालणार असा प्रश्नही हे नागरिक आता करत आहे. दिवाळी असल्याने या वसुलीचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.