सुनिल दवंगे
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संगमनेरमध्ये मात्र एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. त्यामुळे संगमनेर पेटले असून हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्या बाबत वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील हे पण मंचावर उपस्थित होते. मात्र त्यांनी त्यांना त्यावेळी रोखलं नाही. देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात केलेले वादग्रस्त वक्तव्य वाऱ्या सारखे संपूर्ण संगमनेरमध्ये पसरले. त्यानंतर त्याचे तिव्र पडसात संपूर्म तालुक्यात उमटले आहे. शिवाय अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना ही घडल्या आहेत. शिवाय जयश्री थोरात यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत देशमुख यांच्या अटकेची मागणी केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सध्या संगमनेरमध्ये विशेष लक्ष घातले आहे. त्यातून त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. त्यातून त्यांनी युवा संकल्प मेळावे सुरु केले आहे. शुक्रवारी धांदरफळ येथे ही ते मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष वसंतराव देशमुख होते. त्यावेळी बोलताना वसंतराव देशमुख यांची जिभ घसरली. त्यांनी थेट बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री यांच्याबाबत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले. एका महिले बाबत असं वक्तव्य केल्याने सभेतील महिलांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर धांदरफळ येथिल महिलांनी सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळावा मंचाचा ताबा घेत कारवाईची मागणी केलीये.
ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने
त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले आहे. जयश्री थोरात यांनी तर कार्यकर्त्यांसह रात्रभर संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केले. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर संगमनेर तालुक्यात तिव्र पडसाद ही उमटले. तालुक्यात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. तर देशमुख यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जयश्री थोरातांसह कार्यकर्त्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला.
त्यानंतर अनेक थोरात समर्थक संगमनेर तालुका पोलीस स्टेशनाला जमा झाले होते. थोरात कन्या जयश्री थोरात, माजी आमदार सुधीर तांबे , माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबेसह शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या देत वक्तव्य करणारे देशमुख आणि सुजय विखे यांच्या अटकेच्या घोषणा दिल्या. तर त्याच बरोबर माजी आमदार सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबेंनी थेट सुजय विखेंना लक्ष केल.
धांदरफळ येथील प्रकारानंतर सुजय विखे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत देशमुखांचे ते विधान आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे. ते महायुतीचे सदस्य नसल्याच स्पष्ट करत महीले विरोधात वक्तव्य करणाऱ्या देशमुख यांच्या वर कारवाई झालीच पाहीजे. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोषींवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलीये. देशमुख यांनी केलेले विधान निंदनीय असून महायुती सोबत काहीही संबध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे केलेल्या अक्षेपार्ह विधानासाठी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर त्याच बरोबर वाहनांची तोडफोड, गळादाबण्याचा प्रयत्न विनयभंग असे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world