NEET PG परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात आतापर्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. NEET आणि युजीसी नेट पेपर (UGC NET Paper) लीक प्रकरणातील वादादरम्यान केंद्र सरकरने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी आयएएस प्रदीप सिंह खरोला यांची एनटीएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप सिंह खरोला यांच्यावर एनटीएच्या महासंचालकपदी अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्यावर भारत व्यापार संवर्धन संघटनेचे अध्यक्षपद आणि एमडीची जबाबदारी आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर प्रश्नचिन्ह
NEET पेपर लीक आणि UGC-NET च्या परीक्षेतील पेपर लीक प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजेन्सीवरून सातत्याने सवाल उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. याशिवाय सरकारने 21 जून रोजी युजीसी नेटची परीक्षा स्थगित केली होती. आता कर्नाटक कॅडरचे प्रदीप सिंह खरोला यांच्यावर NTA ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नक्की वाचा - पेपर फुटी विरोधातील कायदा मध्यरात्रीपासून लागू,'या' आहेत कडक तरतूदी
Pradeep Singh Kharola has been given additional charge of the post of Director General, National Testing Agency (NTA), Ministry of Education. pic.twitter.com/owLKo75ApU
— ANI (@ANI) June 22, 2024
सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल...
पेपर लीक वादावरून सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 5 मे रोजी झालेल्या NEET-UG मधील कथित अनियमिततेची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. या परीक्षेत सामील 10 विद्यार्थ्यांकडून दाखल याचिकेत बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने आणि वरिष्ठ न्यायालयासमोर रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्याचा आग्रह केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world