बिहारच्या पाटना पोलिसांनी सोमवारी जन सुराज्यचे प्रमुख प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं आहे. ते बिहार लोकसेवा आयोग परीक्षेच्या पेपर लिक विरोधात कारवाईची मागणी करीत अनिश्चितकाळासाठी उपोषणाला बसले होते. 2 जानेवारीपासून बीपीएससी परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात प्रशांत किशोर हे उपोषणाला बसले होते. त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.
#WATCH | BPSC protest | Bihar: Patna Police detains Jan Suraaj chief Prashant Kishor who was sitting on an indefinite hunger strike at Gandhi Maidan pic.twitter.com/cOnoM7EGW1
— ANI (@ANI) January 5, 2025
आज 6 जानेवारी रोजी पहाटे पाटना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world