Solapur News : मेंदूविकारतज्ज्ञ शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, रुग्णालयातील महिला अधिकारीला अटक

सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Neurologist Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापुरातील इतकं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व इतकं टोकाचं पाऊल कसं उचलू शकतो याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहिली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नक्की वाचा - Solapur News : सोलापुरचे विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. वळसंगकर कशामुळे होते तणावात? आत्महत्येचं धक्कादायक कारण

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयांकडून नोंद न करता पैसे आकारले जात होते. यावर वळसंगकर यांनी आक्षेप नोंदवला होता. याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती, तिलाही वळसंगकर यांनी कामावरुन काढून टाकलं होतं, अशीही माहिती सांगितली जात आहे. या महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढून काढल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टरांना दिली होती. या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.