मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Patna JDU Leader Murder: जेडीयू नेत्याच्या हत्येचे वृत्त समजताच आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती देखील पुनपुन येथे दाखल झाल्या आहेत आणि पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Patna JDU Leader Murder: बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी हिंसाचाराची घटना घडली आहे. पाटणामध्ये बुधवारी (24 एप्रिल) रात्री जेडीयू नेत्याची (JDU Leader Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लग्नसोहळ्यावरून परतत असताना जेडीयू नेते सौरभ कुमार यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ही खळबळजनक घटना पाटणामधील पुनपुन परिसरात घडली. या हल्ल्यामध्ये सौरभ कुमारसोबत उपस्थित असलेला व्यक्ती देखील जखमी झाला आहे. दरम्यान जेडीयू नेत्याच्या हत्येनंतर समर्थक मोठ्या प्रमाणात आपला संपात व्यक्त करताना दिसत आहेत.    

(नक्की वाचा: सख्खा शेजारी पक्का वैरी! क्षुल्लक वादाचा असा घेतला बदला की संपूर्ण सोसायटी हादरली)

बाइकस्वारांकडून JDU नेत्यावर हल्ला 

सौरभ कुमार हे नीतिश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पार्टीचे युवा नेते होते. बुधवारी रात्री लग्न समारंभाहून घराकडे परतत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बाइकवरून आलेल्या चार जणांनी सौरभ कुमार यांच्या डोक्यातच दोन गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यात त्यांचा साथीदार मुनमुनवरही गोळीबार केला. हल्ल्यात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळेस डॉक्टरांनी सौरभ कुमार यांना मृत घोषित केले, तर साथीदार मुनमुनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा: प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, तलवारीने वार करून भावोजीची केली हत्या)

मीसा भारतीने घेतली पीडित कुटुंबाची भेट 

हत्याकांडाची माहिती मिळताच उशीरा रात्री पाटणा पोलिसांचे एक विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे स्थानिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. स्थानिकांच्या गोंधळामुळे परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. दरम्यान जेडीयू नेत्याच्या हत्येचे वृत्त समजताच आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांनीही पुनपुन येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

(नक्की वाचा: गोंदिया गोळीबाराचं जबलपूर कनेक्शन; गोलू तिवारी हत्या प्रकरणात 7 आरोपींना अटक)

VIDEO: राजकीय धुळवडीत स्थानिकांना भेडसावतोय 'धुळी'चा त्रास

Topics mentioned in this article