- मनोज सातवी/ बोईसर
पालघरमधील बोईसर येथील भंडारवाडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेसह तिच्या मुलीला बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टीचा राग मनात ठेवून शेजाऱ्यांनीच या मायलेकींना जबर मारहाण केली. विमल मधुकर पाटील आणि त्यांची मुलगी डॉक्टर सोनाली पाटील असे मारहाण करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
या मारहाणीमध्ये डॉक्टर सोनाली पाटील गंभीर स्वरुपात जखमी झाल्या आहेत. या मारहाणी प्रकरणी तीन आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण सर्व आरोपी फरार आहेत. तेजल पाटील, प्रतिभा पाटील आणि प्रकाश पाटील अशी फरार आरोपींची नावे आहेत. ही खळबळजनक घटना भक्ती निवास पार्क को. ऑ. हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे.
(नक्की वाचा: प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, तलवारीने वार करून भावोजीची केली हत्या)
नेमके काय आहे प्रकरण?
सहा महिन्यांपूर्वी विमल पाटील यांनी त्यांच्या वरील मजल्यावरील रहिवासी प्रशांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तुमच्या गॅलरीतून पाणी वाहत असल्याने आमचे कपडे खराब होत आहेत, अशी तक्रार विमल यांनी प्रशांतकडे केली होती. याचाच राग मनात ठेवून प्रशांत पाटील यांच्या आईवडील आणि पत्नीने सहा महिन्यांनंतर वाईट पद्धतीने बदला घेतला.
(नक्की वाचा: प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video)
पाटील कुटुंबाने अक्षरशः बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मायलेकींना मारहाण केली. या मारहाणीमध्ये डॉ.सोनाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा: पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का, दुसऱ्याच दिवशी नवऱ्यानेही संपवलं आयुष्य)
दरम्यान, या मारहाणी प्रकरणी तीनही आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
VIDEO: शिवसेनेच्या प्रचारगीतावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार ?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world