जाहिरात

Watermelon Death: रात्री खाल्लं कलिंगड, सकाळी चिमुरडा मृतावस्थेत; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीवन-मरणाशी संघर्ष

रात्रीच्या वेळी खाल्लेलं कलिंगड सकाळी कुटुंबासाठी भयंकर जीवघेणं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Watermelon Death: रात्री खाल्लं कलिंगड, सकाळी चिमुरडा मृतावस्थेत; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीवन-मरणाशी संघर्ष

Watermelon Death Incident : रात्रीच्या वेळी खाल्लेलं कलिंगड सकाळी कुटुंबासाठी भयंकर जीवघेणं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात संशयास्पद फूड पॉइजनिंगमुळे एका लहानग्याचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील अन्य पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे केवळ कुटुंबावर संकट कोसळलं नाही तर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

कलिंगड खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली...

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडई ब्लॉक्या कुपुनी गावात गुरुवारी रात्री कुटुंबाने कलिंगड खाल्लं. यानंतर त्यांची तब्येत बिघडेल असा कुणी विचारही केला नसेल. सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आणि पुढील काही वेळात उलट्या आणि जुलाब सुरू झाले. 

एकाच वेळी कुटुंबातील सहा जणं पडले आजारी

पाहता पाहता कुटुंबातील सहा जणं अचानक आजारी पडले. प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येता सर्वांना तातडीने केंद्रपाडा जिल्हा मुख्य रुग्णालयात हलविण्यात आलं. तेथे तीन रुग्णांना भरती करण्यात आलं, तर दोघांची प्रकृती जास्त गंभीर झाल्याने त्यांना कटक येथे पाठविण्यात आलं.  उपचारादरम्यान कुटुंबातील अल्पवयीन स्वाधीन सेनापती याचा मृत्यू झाला. या वृत्तानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. अवघ्या एका रात्रीतून आनंदी कुटुंबावर दु:ख कोसळलं. कोणी असा विचारही केला नसेल. कुटुंबातील इतर सदस्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. 

नक्की वाचा -  गावातील मुलीच्या 'त्या' कृत्याने तरुणाचा आत्मसन्मान दुखावला; वडिलांना फोन करून संपवलं जीवन

कुटुंबाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम...

कुटुंबातील सदस्य चारुलता सेनापती यांनी सांगितलं की, रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर मुलांची तब्येत बिघडली. सकाळी मुलं ट्यूशनहून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं. सकाळी पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. कुटुंबातील पाच जण रुग्णालयात भरती असल्याचही चारुलता सेनापती यांनी सांगितलं. 

डॉक्टर काय म्हणाले?

केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अंबिका प्रसाद नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती केलेल्या रुग्णांमध्ये जुलाब, उटल्या आणि पोटदुखीचा त्रास दिसत आहे. प्राथमिक तपासात डॉक्टरांनी फूड पॉइजनिंग असल्याचं सांगितलं. कलिंगडामध्ये कोणत्या प्रकारचा संसर्ग होता की, या अन्न विषबाधेमागे दुसरे काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com