लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? नागपुरात वाद अन् एकाचा बळी!  

सध्या लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार जिंकणार हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार समोर आला.

जाहिरात
Read Time: 1 min
नागपूर:

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं असून आता केवळ निकालाची प्रतीक्षा आहे. यंदाची निवडणुकीत एका पक्षाचे दोन गट पडल्याने मतदानांमध्ये संभ्रम होता. पक्ष फोडाफोडी शिवाय बरेच पक्षचिन्ह असल्याने अनेक मतदारांकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता. आता निकाल काय येणार याबाबत वाद प्रतिवाद सुरू आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार जिंकणार हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. नागपुरात या वादातून एकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात सिंगारखेडा गावात ही घटना घडली आहे. लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार जिंकणार यावरुन दोन तरुणांमध्ये वाद झाला होता.

नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघात : जामीन मिळाल्याच्या खुशीत माजोरड्या आरोपीचं रॅप साँग?

या वादावादीत मारहाण होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 34 वर्षीय प्रवीण बोर्डे नावाच्या व्यक्तीने 35 वर्षीय सतीश फुले याला मारहाण केल्याने त्याचा जीव गेल्याची घटना घडली आहे. सतीश फुले याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. शरीराच्या नाजूक भागावर मार लागल्याने सतीशचा मृत्यू झाला. सतीशच्या मृत्यूनंतर प्रवीणने गावातून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला जवळच्या सावरगाव येथून अटक केल्याची माहिती आहे.