जाहिरात
Story ProgressBack

पालकांनो मुलांवर ठेवा लक्ष! इन्स्टाग्राममुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त

Palghar Crime: पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत जे काही घडले आहे, ते अतिशय चिड आणणारे आहे. पालकांनो तुमचे मुलांवर लक्ष आहे का?

Read Time: 2 min
पालकांनो मुलांवर ठेवा लक्ष! इन्स्टाग्राममुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त

मनोज सातवी, पालघर  
Palghar Crime News: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ओळख झाली, ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले आणि यानंतर अल्पवयीन मुलीसोबत जे काही घडले ते अतिशय भयंकर, संतापजनक व चिड आणणारे आहे. एका 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर दोन जणांनी बलात्कार केल्याचे संतापजनक वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक घटना रविवारी ( 5 मे 2024) पालघरमधील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ओळख, प्रेम आणि विश्वासघात

पालघरमधील तलासरी तालुक्यातील उधवा ठाकरपाडा परिसरातील रहिवासी असणारा राहुल उर्फ अनिकेत लहान्या दळवी (वय 24 वर्ष) याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका 15 वर्षीय मुलीसोबत ओळख वाढवली. या ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. यानंतर राहुलने 30 एप्रिल रोजी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. दरम्यान 5 मे रोजी राहुल आणि त्याचा मित्र नितेश महादू बिज (वय 25 वर्ष)  या दोघांनी मिळून शेतामध्ये बलात्कार केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. 

(नक्की वाचा: दिल्लीतील फर्जी गजाआड, कल्याण पोलिसांनी जप्त केल्या हजारोंच्या बनावट नोटा)

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

इंस्टाग्रामवरील मित्राने विश्वासघात केल्याचे लक्षात येताच सोमवारी (6 मे 2024) सकाळी पीडित मुलीने तलासरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा:  डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)

आरोपींनी लपवली होती ओळख 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक आणि त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना काही तासांमध्येच अटक केली. आरोपींनी पीडित मुलीपासून त्यांची खरी ओळख लपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. नावे तसेच ओळख माहीत नसतानाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अतिशय कमी वेळात आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रिजवाना काकेरी करत आहेत. 

दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा:  डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)

VIDEO: Pearl Farming | आजारपणावर मात करत केली मोत्यांची शेती, पूजा भानुशाली यांची यशोगाथा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination