जाहिरात

पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Road Accident : या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.

पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
पाली:

पाली खोपोली राज्य महामार्ग (Pali Khopoli State Highway) मृत्यूचा सापळा बनत आहे. या राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) दुपारी पाली खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळील नेव्ही कॉलेज समोर बाईकची शाळेच्या बसला धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बाईकवरील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली. (Road Accident)

श्रीराज एज्युकेशन सेंटरची शाळेची बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती. यावेळी पालीकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईकस्वार शाळेच्या बसला जाऊन धडकला. या बाईकवर तिघेजण प्रवास करीत होते. यावेळी स्कूल बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस उपस्थित होते. हा अपघात इतका भीषण होता की, धडक देतान बाईकवरील तिघेही हवेत उडाले. या अपघातात मोनेश बालू वाघमारे (गाव  दिघेवाडी), नवनाथ वामन जाधव  (गाव कुभेंरी), विलास विष्णू घोगरे  (गाव कुंभेरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण

नक्की वाचा - मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण

याच राज्य महामार्गावर दापोडे गावाजवळ मंगळवारी (17 सप्टेंबर) एनसीसीचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी बस बाजूच्या शेतात कलंडली होती. सुदैवाने या अपघातात 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले.
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
बदलापूर प्रकरण- FIR व्हायरल केल्याचा आरोप, वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळकेंविरोधात तक्रार
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
dream-leads-to-murder-solved-in-ratnagiri-khed-shocking-incident
Next Article
स्वप्नात हत्या झाल्याचे पाहिले, पोलिसांना सांगितले, घटनास्थळी जाताच पोलीसही चक्रावले