गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील महिला (Pune woman dies while paragliding in Goa) पर्यटक आणि पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोकळ्या आकाशात, डोंगर-दरींमध्ये उडण्याचा अनुभव घेणं कोणाला आवडणार नाही. मात्र हाच अनुभव घेणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 27 वर्षीय शिवानी डबले आणि 26 वर्षीय पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाळी यांचा उंचीवरुन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. हा अपघात 18 जानेवारीला झाला. पॅराग्लायडिंगचं आयोजन करणाऱ्या कंपनीकडे वैध परवाने नसल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मांडरेम पोलिसांकडून तपास सुरू...
या दुर्घटनेनंतर मांडरेम पोलीस ठाण्यात दोघांच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात हाइक एन फ्लाय कंपनीचा मालक आणि पॅराग्लायडिंग पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Pune Nashik Highway Accident: अप'घात'वार! तीन वाहनांची भीषण धडक, 9 जणांचा करुण अंत; दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हळहळला
18 जानेवारीला घडली दुर्घटना...
18 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 ते 5.00 दरम्यान केरी पठार, पेरनेम येथे हा अपघात घडला. हाइक एन फ्लाय कंपनीचे मालक शेखर रईजादा यांनी सुरक्षा उपकरणांशिवाय पॅराग्लायडिंग करण्याची परवानगी दिली होती. त्याला या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरविण्यात आलं आहे. कंपनी परवानगीशिवाय आणि सुरक्षा उपकरणांशिवाय पर्यटकांना पॅराग्लायडिंग करू देत होती.
27 वर्षी पुण्याची तरुणी आणि नेपाळी नागरिकाचा मृत्यू...
या अपघातात 27 वर्षीय पुण्याची निवासी शिवानी डबले आणि 26 वर्षीय पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही मृतांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. शिवानीच्या कुटुंबाकडून पॅराग्लायडिंग कंपनीविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.