पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये एका मालगाडीने कांचनजुंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच 60 प्रवासी जखमी झाले आहेत. जलपाईगुडी परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कांचनजुंगा एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती. या घटनेशी संबंधित काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा अपघात किती भीषण होता, हे फोटोंच्या माध्यमातून समजते. धडकेमुळे ट्रेनचे डबे एकावर एक चढले आहेत. आगरतळाहून निघालेल्या कांचनजुंगा एक्सप्रेसचे शेवटचे तीन डब्यांना मालगाडीची धडक बसली.
कटिहार विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणाले की, 13174 कांचनजुंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहकडे जात असताना ही दुघर्टना घडली.
दुर्घटनेमध्ये एकूण 15 जणांचा मृत्य तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
#WATCH | Kanchenjunga Express train rammed by a goods train at Ruidhasa in Darjeeling district of West Bengal; Police team present at the spot, rescue work underway pic.twitter.com/Y3UsbzPTxs
— ANI (@ANI) June 17, 2024
न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
कटिहार विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणाले की, 13174 कांचनजुंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहला जात असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Kanchanjunga Express: मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; आठवड्याच्या सुरुवातीला भीषण दुर्घटना
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world