सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पत्नीच्या खुनाच्या चौकशीसाठी बोलावलेल्या पतीने पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात स्वच्छता करण्याचे केमिकल पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुपीनगर माऊली हौसिंग सोसायटी रुपीनगर या ठिकाणी पती पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. याठिकाणी शरद रुपचंद चितळे या व्यक्तीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले, त्याच वेळी त्याची 26 वर्षीय पत्नी कांचन शरद चितळे ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी पत्नी कांचन यांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तर जमलेल्या लोकांनी पती शरद चितळे यांना लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले. यावेळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केलेल्या कांचन चितळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या शव विच्छेदन अहवालात त्याचा हाताने व नायलॉन दोरीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांचा पती शरद चितळेवर संशय होता. याबाबत पती शरद चितळे यांना लोकमान्य हॉस्पिटलतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना चिखली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
यावेळी पोलिसांसमोर पती शरद चितळे याने आपल्या पत्नीचे इतर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याने मी तिचा खून करत स्वतः हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस जबाबात म्हटले. मात्र तपास चालू असतानाच त्याने चिखली पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहात जात फरशी फुसण्याचे केमिकल पिऊन पुन्हा आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
(नक्की वाचा- नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)