सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune Crime : पुण्यातील कायदा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एक ऐरणीवर आला आहे. स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणानंतर आता थेट पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह पोलीस उपायुक्त गंभीर जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री 12.15 च्या सुमारास बहुळ गावात दरोडा पडणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा रचून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोशी गावात आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होता.
नक्की वाचा - Sangli Crime : पाटलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् अचानक मृत्यू; चौकशीदरम्यान पत्नी-लेकाचा मोठा प्लान उघड
यावेळी पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत होते. यावेळी आरोपी सचिन भोसले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस उपायुक्तांनी दरोडेखोर सचिन भोसले यांच्या पायावर दोन राऊंड फायर केले. त्यातील एक राऊंड त्याच्या पायाला लागून तो जखमी झाला आहे.