- सुरज कसबे, प्रतिनिधी
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. मानसिक तणाव आणि कौटुंबिक विरहातून एका तरुणाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेमुळे स्थानिक हादरले आहेत. केशरी प्रसाद शाहू असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. केशरीने भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाइव्ह करत आपली व्यथा मांडली होती, या व्हिडीओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फेसबुक लाइव्ह करत व्यक्त केल्या भावना
मिळालेल्या माहितीनुसार, केशरी प्रसाद शाहू हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी आणि मुलीपासून वेगळा राहत असल्यामुळे प्रचंड तणावात होता. गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याने भाजी मंडई गाठली. येथील पाण्याच्या टाकीवर चढून त्याने फेसबुक लाइव्ह केले. या व्हिडीओमध्ये तो आपल्या पत्नी आणि मुलीची आठवण काढून ढसाढसा रडताना दिसतोय. फेसबुक लाइव्हमध्येच पत्नी-मुलीचा विरह सहन होत नसल्याचे सांगत त्याने टाकीवरून उडी घेतली.
(नक्की वाचा: Solapur News: आधी हात जोडले मग मृत्यूला कवटाळलं! प्रसिद्ध बेकरीच्या मालकाची 17व्या मजल्यावरून उडी VIDEO VIRAL)
सुसाइड नोटमधील गंभीर आरोप
या घटनेचा तपास भोसरी पोलीस करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी तीन पानांचे सुसाइड नोट सापडलीय. सुसाइड नोटमध्ये त्याने काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच लोकांनी पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यानं चिठ्ठीमध्ये केलाय. केशरीने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की, "मी पूर्ण शुद्धीत ही चिठ्ठी लिहीत आहे. माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा सहभाग आहे. त्यांना तिचं सध्याचं ठिकाण माहिती आहे, असा माझा आरोप आहे. माझ्या आणि तिच्या वादाचा गैरफायदा घेऊन पत्नीला पळवून लावलंय. माझ्या मृत्यूस तेच जबाबदार असून मला न्याय हवाय. सोनं-चांदी घेतल्याचा आणि मला धमकावल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं नाही, याबाबतही तक्रार आहे. मला पत्नी-मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं, मुलीवर माझं अपार प्रेम आहे. एक नंबर खोलीतील व्यक्तींवर संशय आहे".
फेसबुक लाइव्ह करत तरुणाची आत्महत्या VIDEO
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत. सुसाइड नोटमध्ये नाव असलेल्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555help@vandrevalafoundation.com022-25521111
Topics mentioned in this article
|