पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..

Panvel Farm House Viral News :  पनवेल येथील तळोजा परिसरात सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे असलेल्या एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Panvel Crime Latest News
मुंबई:

Panvel Farm House Viral News :  पनवेल येथील तळोजा परिसरात सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे असलेल्या एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला. ज्यावेळी आरोपी या महिलेचा अश्लील व्हिडीओ काढत होता, त्याच दरम्यान आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आलं. याप्रकरणी रियान्स फार्म हाऊस मॅनेजर मनोज भगवान चौधरीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज चौधरी यांनी धानसर येथील फार्म हाऊस भाड्याने चालवण्यासाठी घेतले आहे. 25 ऑक्टोबर रोजी हे फार्म हाऊस काही नागरिकांनी भाडे तत्वावर घेतले. रात्री दोन वाजताच्या सुमारास धानसर गाव येथील रियान्स फार्म हाऊस येथील मॅनेजर मनोज चौधरीने बाथरूम मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण स्पाय कॅमेरा बसवला. महिला बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी गेले असता तिचा धक्कादायक व्हिडीओ काढला. याचदरम्यान पोलिसांनी आरोपी मनोज चौधरीला रंगेहाथ पकडून त्याला अटक केली. या घटनेमुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, आरोपीने याआधीही असं कृत्य केलं आहे का? याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

नक्की वाचा >> धुळ्यात भरदिवसा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखलं..थरारक CCTV Video आला समोर

तळोजा येथील फार्महाऊसवर नेमकं काय घडलं होतं?

पनवेलचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलंय की, तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रियान्स नावाचं एक छोटसं फार्महाऊस आहे. तिथे वीकेंडला काही कुटुंब भाड्याने राहतात. त्या फार्महाऊसमध्ये एक हॉल आणि एक बेडरुम आहे. दोन्हीकडे दोन टॉयलेट आहेत. मुंब्रा येथील एक फॅमिली त्यांच्या नातेवाईकांसह तिथे राहण्यासाठी होती. त्या कुटुंबातील एक व्यक्ती त्या टॉयलेटमध्ये गेला तेव्हा त्याला संशय आला. तिथे असलेल्या होल्डरच्या खाली त्यांना सुक्ष्म कॅमेरा दिसून आला.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा फार्महाऊस जो व्यक्ती चालवत आहे, त्याचं नाव मनोज चौधरी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. या कॅमेरात जे व्हिडीओ रेकॉर्ड व्हायचे, ते व्हिडीओ तो स्वत:च्या मोबाईलवर डाऊनलोड करायचा. तो स्वत:ला पाहण्यासाठी हे व्हिडीओ डाऊनलोड करायचा, हे पोलीस तपासात समोर आलं आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Anaya Bangar : गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..