जाहिरात

Raigad News: गोवा-मुंबई बस प्रवासात संतापजनक घटना, महिला झोपेत असताना क्लिनरने तीन वेळा केला नको तो प्रकार

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये महिला प्रवशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Raigad News: गोवा-मुंबई बस प्रवासात संतापजनक घटना, महिला झोपेत असताना क्लिनरने तीन वेळा केला नको तो प्रकार
Woman Molested In Goa Mumbai Bus

मेहबुब जमादार, प्रतिनिधी 

Woman Molested In Goa Mumbai Bus : गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये महिला प्रवशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासा दरम्यान बसच्या क्लिनरने तीन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संगमेश्वर येथे बस पोहोचल्यावर महिला झोपेत असताना आणि नंतर पोलादपूर येथे या महिलेसोबत विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार घडला,असा आरोप आहे.आरोपीचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीय.

पहाटे साडेतीनच्या सुमारास नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.कोलाड पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हे प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-43-2981 क्रमांकाच्या बसमध्ये एका महिला प्रवाशासोबत तीनवेळा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला छत्रपती संभाजीनगर येथील असून पहाटे साडेतीनच्या सुमारास बसच्या स्टाफकडून तिचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील अनेक नागरिक गरवारे पुलाखाली उतरले, त्याचवेळी मुठा नदीला आला पूर, पुढे असं काही घडलं..

कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी संबंधित संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे,अशी माहिती कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी दिली आहे. या घटनेबाबत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

नक्की वाचा >> Chandrapur News: वडिलांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकले, नंतर मुलाने केलं भयंकर कांड, 24 तासांतच आरोपीला पकडलं

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com