पुण्यात पार्टीनंतर घरी परतणाऱ्या तरुण-तरुणीला पोर्शे कारची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

दोघेही कल्याणीनगरमध्ये बॉलर पबमध्ये पार्टीकडून साधारण 3.15 च्या सुमारास घरी परतत होते. 

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात तरुण-तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघे रात्री उशिरा पार्टी करून घरी परतत होते. यावेळी एक अत्यंत महागडी पोर्शे कारने त्यांच्या बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही हवेत उडाले. अपघातानंतर जागीच दोघांचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणी नगर भागात शनिवारी मध्यरात्री एक महागड्या कारने बाईकला धडक दिली. या धडकेत तरुण-तरुणी हवेत उडाले आणि दुसऱ्या कारला पडले. यातच दोघांचाही मृत्यू झाला. दोघेही कल्याणीनगरमध्ये बॉलर पबमध्ये पार्टीकडून साधारण 3.15 च्या सुमारास घरी परतत होते. 

नक्की वाचा - VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?

पोर्शे कार  चालवणारा तरुण अल्पवयीन असून तो श्रीमंत घरातील असल्याचं समोर आलं आहे. पोर्शे ही अत्यंत महागडी कार असून याची भारतातील किंमत एक ते दीड कोटींपासून सुरू होते. या अपघातात गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर स्थानिकांनी त्या तरुणाला कारबाहेर काढलं. त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.  मृतांमध्ये अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा समावेश आहे.