जाहिरात

VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?

मुंबईतील घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपवर अजस्त्र होर्डिंग हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (16 मे 2024) सकाळी ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?
घाटकोपर होर्डिंग हादसे का वीडियो हुआ वायरल

Ghatkopar Hoarding Collapse Accident: घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील पेट्रोल पंपवर नेहमीप्रमाणेच वाहनचालकांची वर्दळ होती. पेट्रोल पंपवरील सर्व जण आपापल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरले जाण्याची प्रतीक्षा करत होते. पेट्रोल पंपबाहेर जोरदार पाऊस सुरू होता, वादळीवारे वाहत होते. सारे काही सामान्यच वाटत होते. पण काही सेकंदांमध्ये जे काही घडले, त्याबाबत कोणीही कल्पना केली नसावी. वादळीवाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर जवळपास 250 टन वजनाचे होर्डिंग काही सेकंदांमध्ये कोसळले आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. होर्डिंग कोसळताच जीवाच्या आकांताने लोकांनी आरडाओरडा केला. पण घटना इतकी भीषण होती की दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदत पोहोचणे शक्यच नव्हते.  

(नक्की वाचा: आईवडील अडकले ढिगाऱ्याखाली, लेक परदेशात; 55 तासांनंतर असा लागला शोध)

Latest and Breaking News on NDTV

कोसळलेले होर्डिंग वजनाने इतके जड होते की स्थानिकांची इच्छा असतानाही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना ते मदतीचा हात देऊ शकले नाहीत. या दुर्घटनेचा काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये थरकाप उडवणारे दृश्य कैद झाले आहे. वादळीवारे आणि पावसामुळे अजस्त्र होर्डिंग पेट्रोल पंपवर पडले आणि मोठी दुर्घटना घडली.  

(नक्की वाचा: होर्डिंग दुर्घटनेवरून राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधकांचे आरोप प्रत्यारोप)

Latest and Breaking News on NDTV

त्या संध्याकाळी नेमके काय घडले?

सोमवारी मुंबईच्या (13 मे 2024) हवामानामध्ये अचानक बदल झाले होते. वादळीवारे आणि जोरदार पावसामुळे घाटकोपरमध्ये अजस्त्र होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

(नक्की वाचा: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 'त्यांनी' सांगितला अंगावर काटा आणणारा थरार)

घटनास्थळावरील व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर दुर्घटनेची तीव्रता जाणवते. रिपोर्ट्सनुसार 100 फूट उंच आणि 250 टन वजनाच्या लोखंडी होर्डिंगखाली कित्येक लोक वाहनांसह दबले गेले. होर्डिंगचे वजन इतके होते की ते मशीन आणि गॅस कटरच्या वापराशिवाय काढणे शक्यच नव्हते.  

Latest and Breaking News on NDTV

अवैध होर्डिंगने घेतला निष्पापांचा जीव 

इगो मीडियाने घाटकोपरमध्ये जीआरपीच्या जमिनीवर एक नव्हे तर तब्बल 4 अवैध होर्डिंग उभारले आहेत, अशी माहिती पोलीस तपासादरम्यान समोर आली आहे. दुर्घटनेनंतर अन्य तीन होर्डिंग हटवण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. तसेच इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. फरार भावेश भिंडेचा शोध घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी आठ पथक स्थापित केली आहेत पण अद्याप पोलिसांना यश मिळालेले नाही.  

VIDEO: भोरमध्ये जमिनीच्या वादातून ब्रिगेडीअरचा (निवृत्त) गोळीबार, गुन्हा दाखल