नागिंद मोरे, धुळे
मित्रासोबत मस्करी करणे दोन मित्रांना चांगलच महागात पडलं आहे. लष्कर-ए-तोयबाचे 'अतिरेकी' सांगून मित्रासोबत प्रँक करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. धुळे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहतीनुसार, अतिरेकी संघटना लष्कर ए तोयबाचे अतिरेकी असल्याचे सांगून धुळ्यातील दोघा मित्रांनी मिळून एकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आहे. आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअप कॉल असल्याने पोलीसही सतर्क झाले. धुळे सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कायद्याच्या कचाट्यात आणले आहे.
(नक्की वाचा- भाविकांसोबत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भयंकर घडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
धुळे येथे राहणाऱ्या इम्रान हारुन शेख तरुणाला एक व्हाट्सअॅपद्वारे फोन आला होता. त्यांच्याच मित्रांनी हा फोन केला होता. लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे मित्रांनी फोनवर सांगितले. विविध प्रकारचे आमिष दाखवून इम्रानला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- बोट दुर्घटनेमुळे आता कोकण हादरलं; 7 खलाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली)
मात्र प्रकरण गंभीर असल्याचे वाटल्याने इम्रान शेखने ताबडतोब धुळे सायबर पोलिसात धाव घेत तेथे तक्रार दिली. यानंतर पोलिसांनीही प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला. त्यावेळी धुळ्यातीलच त्याचे मित्र यामागे असल्याचे समोर आले. पोलिसांना याप्रकरणी हृषिकेश भांडारकर आणि त्याच्या एका साथीदाराला फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला आहे.