Prashant Koratkar : धोकादायक कैद्यांसाठी असलेल्या अंडासेलमध्ये कोरटकरची रवानगी, अंडासेलच का?

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत मुरलीधर कोरटकरवर गुन्हा दाखल आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, प्रतिनिधी

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयच्या या निर्णयानंतर कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तो 14 दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत मुरलीधर कोरटकरवर गुन्हा दाखल आहे. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात हा गुन्हा नोंद आहे. 30 मार्च रोजी झालेल्या सुनावणीमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीसाठी संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याच्यासह दोन्ही बाजूचे वकील ऑनलाईन उपस्थित होते. तब्बल पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला ही न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या सुनावणीनंतर त्याला कळंबा कारागृहात नेण्यात आलं. कळंबा कारागृहात नेल्यानंतर त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. 

Advertisement

प्रशांत कोरटकरला 25 मार्च रोजी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली. 28 मार्च रोजी पुन्हा या कोठडीत दिवसाची वाढ केली. यानंतर 30 मार्च रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. आता ही न्यायालयीन कोठडी 14 दिवस असणार आहे. ही कोठडी सुनावल्यानंतर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी न्यायाधीशांकडे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्याची विनंती केलेली. अटक केल्यापासून त्याच्यावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला. यामुळेच कोरटकरची कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कोरटकरला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी अनेक शिवप्रेमीनी आक्रमक भूमिका घेत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला. कार्यकर्तेच नाही तर एका वकिलाने देखील त्याच्यावर हल्ला केलेला. ही सगळी परिस्थिती पाहता विविध संघटना, काही शिवप्रेमी आक्रमक भूमिकेत आहेत. त्यामुळेच वकील सौरभ घाग यांनी त्याची विशेष सुरक्षा असावी अशी विनंती केलेली. कोरटकरच्या कोठडी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी वकिलांनी अशी विनंती केली असावी असा तर्क लावला जात आहे. 

कोरटकरला कळंबा कारागृहात नेल्यानंतर त्याची विशेष कोठडी देण्याचा प्रश्न निर्माण झाला. कारण बऱ्यापैकी कारागृह भरलेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला वेगळ्या कोठडीत ठेवणं गरजेचं असल्याने त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. आता त्याचा मुक्काम याच कोठडीत असणार असल्याची शक्यता आहे.. या अंडासेलच्या बाहेर आणि आतमध्ये असे एकूण 10 कॅमेरे असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर करडी नजर कारागृह सुरक्षा रक्षकांची असणार हे नक्की. कोरटकरच्या वकिलांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एक एप्रिल रोजी निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे जर कोरटकरला या निर्णयातून दिलासा मिळाला तर कारागृहापासून सुटका देखील होऊ शकते.