स्वानंद पाटील
बीडच्या मस्साजोग- केज महामार्गावर भर दुपारी एका प्रकल्प अधिकाऱ्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले. ऐवढेच नाही तर त्याच्याकडून 2 कोटीच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली. हे करत असताना या अधिकाऱ्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फिरवले जात होते. मात्र एका चित्रपटाच्या कथाला शोभेल असाच स्थितीत या अधिकाऱ्याची त्या खंडणीखोरांच्या तावडीतून सुटका झाली आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केज तालुक्यातल्या मस्साजोग, विडा गावामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. इथे सुनिल शिंदे हे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मागील तीन महिन्यापासून जमीनीचे अधिग्रहण सुरू आहे. या प्रकल्पाचे कार्यालय मस्साजोग येथे आहे. 28 मे ला सकाळी कामाचा आढावा घेऊन शिंदे व त्यांचे कर्मचारी आशुतोष सिंग, शांतनु कुमार, संजय शर्मा हे चौघे जण केज येथील गेस्ट हाऊसला नाष्तासाठी चालले होते. त्यांची गाडी मस्साजोग केज मार्गावरअसणाऱ्या बंद टोल नाक्याजवळ आली. त्यावेळी त्यांच्या समोर एक पांढरी स्कॉर्पिओ येवून थांबली.
हेही वाचा - कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड
त्या गाडीतून रमेश घुले ही व्यक्ती बाहेर आली. त्यांनी गावठी कट्ट्याच्या जोरावर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवलं. पुढे त्यांना एका हॉटेलवर घेऊन जाण्यात आलं. तिथे त्यांना शिवीगाळ करण्यात आली. आमच्या तालुक्यात आम्हाला न विचारता जमीन अधिग्रहण कसे करता अशी विचारणाही केली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर मागितला. त्या क्रमांकावर फोन लावत आमच्या तालुक्यात तुमचे कोणतेही काम होऊ देणार नाही असे त्यांनी धमकावले आणि फोन कट केला. त्यानंतर त्यांनी जमिन अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यालाही फोन लावला आणि भगवानगडा जवळ भेटायला बोलावले.
हेही वाचा - पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे महाबळेश्वर कनेक्शन, नियमच धाब्यावर बसवले
दुपारी साडेतीनच्या सुमारास भगवानगडा जवळ शिंदेंसह ते खंडणीखोर पोहोचले. त्यावेळी शिंदे यांना दहा ते बारा जणांनी घेरले होते. त्यानंतर काही वेळातच जमीन अधिग्रहण करणारे अधिकारी तिथे आले. त्याच्याशी बोलताना तुम्ही आम्हाला न विचारता केज तालुक्यातल्या जमीनी कशा काय घेता? काम सुरू करता. तुम्ही आम्हाला विचारून काम केले पाहीजे. जर तुम्हाला काम करायचे असेल तर दोन कोटी द्यावे लागतील, नाही तर केज तालुक्यात कुठे काम करू देणार नाही, असं धमकावून सांगितले.
हेही वाचा - पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं
त्यानंतर याबाबत पुढे जावून बोलू असे जमीन अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याच वेळी तिथे पोलीस आले. गाडीतून बाहेर येवू नका अशी त्यांना तंबी देण्यात आली. मात्र पोलिसांनी त्याच वेळी चौकशी केली. पोलिस चौकशी करत आहेत हे लक्षात आल्यानंतर खंडणी मागणार रमेश घुले आणि त्याचे सहकारी पसार झाले असे शिंदे यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना केज इथल्या पोलिस स्थानकात घेवून आणण्यात आले. मात्र पोलिस नेमके त्याच वेळी तिथे कसे पोहोचले याची माहिती समजू शकली नाही. दरम्यान सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत मंगळवारी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.