जाहिरात
Story ProgressBack

पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं

चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये एका पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Time: 2 mins
पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं
चिपळून:

चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये एका पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पतीराजाच्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या पत्नीवरील रागातून तरुणाने धक्कादायक पाऊल उचललं. या तरुणाची पत्नी पतीच्या  प्रेयसीला भेटण्यासाठी गेली होती. हे कळताच पतीराजाला राग आला आणि त्याने या रागातून थेट पत्नी काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात धाव घेतली. कार्यालयातच तिच्याशी जोरदार वाद घातला. चिपळुणातील एका शासकीय कार्यालयात सोमवारी घडलेलं प्रकरण झटापटीपर्यंत आलं होतं. अखेर या प्रकाराबाबत पतीविरोधात पत्नीने चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संबंधित महिलेच्या पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. इंदापूर येथील एका महिलेशी पतीचे प्रेमसंबंध आहेत हे कळताच महिला रविवारी इंदापूर येथे पतीच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेली होती. तसेच तिच्याशी वाद घातला. याची माहिती तिच्या पतीला कळताच रागातून तिचा पती महिला काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात गेला.

नक्की वाचा - तरुणी बेपत्ता, ना मृतदेह, ना पुरावा; कारमधील पीरियडच्या रक्ताने कीर्ती व्यास हत्याकांडाचा खुलासा

तिथे त्याने शिवीगाळ करून तिला जाब विचारला. तसेच तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. त्यातून दोघांमध्ये वादावादी व झटापट झाली. त्याचवेळी संबंधित महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. या प्रकारानंतर संबंधित महिलेने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पतीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 327, 353, 186, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पुणे प्रकरणाचे मास्टरमाइंड डॉ. तावरे अन् विशाल अग्रवालचे 14 वेळा फोनवरुन संभाषण
पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं
Sangli Karnataka death case sister Kavita who performed an abortion detained
Next Article
कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड
;