संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur Crime : नागपूर शहरात भरदिवसा देहव्यापाराचं धक्कादायक कृत्य सुरू असल्याचं समोर आलं आहे. देहव्यापारासाठी इथं विविध राज्यातून मॉडेल बोलविण्यात येत होत्या. अखेर पोलिसांनी छापा टाकत येथे सुरू असलेला देहव्यापाराचा व्यवसाय उद्धव केला. काही दिवसांपूर्वीही पोलिसांनी नागपुरात सुरू असलेल्या देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी आणखी एक देहव्यापाराचा मोठा अड्डा उघडकीस आणला आहे. इथे इतर राज्यातून मॉडेल बोलवण्यात येत होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काश्मीर, गुजरात, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील मॉडेल नागपुरात देहव्यापार करण्यासाठी येत होत्या असं समोर आलं आहे. नागपूरच्या छावणी परिसरातील अचरज टॉवर येथील हॅपी स्प्रिंग ओयो हॉटेलमध्ये दिल्ली-पंजाब आणि छत्तीसगढ राज्यातील चार मॉडेल तरुणींकडून देहव्यापार सुरू होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाने छापा घालून चारही तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतलं.
नक्की वाचा - पत्नीच्या हत्येसंबंधी पतीला जेल पण जबरदस्त ट्विस्ट, 4 वर्षांनी बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये सापडली
दिल्लीतून आलेल्या एका तरुणीने सांगितलं की, तिला परदेशात कॅनडाला जायचं आहे. यासाठी पैसे जमा करण्यासाठी दिल्लीहून नागपुरात आल्याचं तरुणीने सांगितलं. तर पंजाबमधून आलेली तरुणी उंची कपडे आणि उच्च लाईफस्टाईलची शौकीन आहे. यासाठी लागणारे पैसे ती देहविक्रय व्यापारातून मिळवत असल्याचं तिने सांगितलं.
तर छत्तीसगढ येथील तरुणी झटपट पैसे कमविण्यासाठी मैत्रिणीने सुचवले म्हणून आली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. हॅपी स्प्रिंग ओयो हे ठिकाण हुक्का स्पॉट म्हणून देखील प्रसिद्ध होते. पोलिसांनी हुक्का पॉट आणि तंबाखु तसेच दोन भ्रमणध्वनी सह 86 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या एकूण प्रकरणी हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या आरोपींची नावे नागपूर निवासी 24 वर्षीय चेतन विजय चकोले आणि चंद्रपूर निवासी 19 वर्षीय युगांत दिनेश दुर्गे अशी आहेत. अन्य दोन दलालांचा शोध पोलीस घेत आहेत, असं नागपूर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांनी सांगितलं.