कोलकात्यात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याचे आरोपी संजय रॉयचा सीबीआयने सायकोएनालिटिक प्रोफाइल तयार केली आहे. यासाठी त्याची सायकोलॉजिकल ऑटोप्सी टेस्ट करण्यात आली आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या टीमने सायकोलॉजिकल ऑटोप्सीदरम्यान संजय रॉयच्या मोबाइल फोनमध्ये आढळलेल्या हिंस्त्र आणि पॉर्न व्हिडिओसंदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आले. संजय रॉय हा सॅटायरासिस हायपरसेक्शुअॅलिटीने बाधित असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
संजय रॉय सेक्स अॅडिक्ट...
Satyriasis Hypersexuality म्हणजे सेक्सची भूक. या चाचणीत संजय सेक्स ॲडिक्ट असल्याचे समोर आले आहे. संजयने चाचणीदरम्यान असंही सांगितले की, तो अनेकदा रेड लाईट एरियात जातो. घटनेच्या दिवशी रेड लाईट एरियात गेला होता का, या प्रश्नावर मात्र त्याने दिशाभूल करणारी उत्तरं दिली.
पाच तासांपर्यंत तज्ज्ञांची टीम वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारत होती. या उत्तरांचं ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. ही ऑडिओ रेकॉर्डिंग विशेष पद्धतीच्या मशीनमध्ये टाकण्यात आले आणि यानंतर त्याच्या आवाजाचं विश्लेषण करण्यात आलं. उत्तर देताना तो खरं बोलत होता की खोटं, याचाही तज्ज्ञांकडून शोध घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीत संजय रॉय सेक्स अॅडिक्ट असल्याचं समोर आलं. सीबीआयच्या सूत्रांनुसार, घटनेच्या दिवशी तो दारू प्यायला होता आणि त्याने अनेक पॉर्न व्हिडिओ पाहिले होते. यानंतर तो रेड लाइट भागात गेला. तेथून परत आल्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य केलं. तपासानुसार, त्याने चार लग्न केली होती. सर्व पत्नी त्याला सोडून निघून गेली होती.
नक्की वाचा - Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा
हायपरसेक्शुअॅलिटी म्हणजे काय?
हायपरसेक्शुअॅलिटी हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. यामुळे लैंगिक उत्तेजना वाढते आणि रुग्ण लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंततो किंवा त्याबद्दल विचार करत राहतो. हायपरसेक्सुअल डिसऑर्डरला सेक्स ॲडिक्शन असेही म्हणतात. या आजाराने ग्रस्त लोकांमध्ये सेक्सचे खूप वेड असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world