Pune News पुण्यात दहावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, Telegram ग्रुप अ‍ॅडमिन विद्यार्थ्याला अटक

पुण्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात टेलिग्राम ग्रुप चालवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune SSC Exam Paper leak Latest Update
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune News Today : पुण्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात टेलिग्राम ग्रुप चालवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चैतन्य शेंडे या विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तो सध्या नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, शेंडे हा टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाची प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवत होता. यासाठी तो प्रत्येकाकडून 600 रुपये आकारत होता.मात्र पैसे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लगेचच ब्लॉक केले जात असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारातून अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या टेलिग्राम ग्रुपवर एकूण 245 सदस्य असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित भाग-1 आणि गणित भाग-2 या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर पुन्हा द्यावा लागणार का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: 'पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद', मुस्लिम बांधवांनी का दिल्या घोषणा? पुण्यात काय घडलं?

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्च रोजी एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात अशी माहिती समोर आली की, 6 मार्च रोजी झालेल्या गणित भाग-1 प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री 8:37 वाजता ग्रुपवर टाकण्यात आले होते.

नक्की वाचा >> Dombivali News : डोंबिवलीच्या 'या' शाळेत 38 टक्के फी वाढ, विद्यार्थी-पालकांना धमकावलं, मनसेनं दिला मोठा इशारा

तसेच 9 मार्च रोजी झालेल्या गणित भाग-2 प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र 6 मार्च रोजी सायंकाळी 4:56 वाजता,म्हणजे तीन दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध होते. मंडळाच्या अधिकृत प्रश्नपत्रिकांशी पडताळणी केल्यानंतर त्या दोन्ही प्रश्नपत्रिका एकसारख्या असल्याचे स्पष्ट झाले.या ग्रुपवर केवळ गणितच नव्हे तर विज्ञान-1 आणि विज्ञान-2 विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचे मेसेजही टाकण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.