जाहिरात

Dombivali News : डोंबिवलीच्या 'या' शाळेत 38 टक्के फी वाढ, विद्यार्थी-पालकांना धमकावलं, मनसेनं दिला मोठा इशारा

डोंबिवलीत एका नामांकित युरो शाळेकडून विद्यार्थ्यांच्या फी मध्ये 38 टक्के वाढ करण्यात आली.

Dombivali News : डोंबिवलीच्या 'या' शाळेत 38 टक्के फी वाढ, विद्यार्थी-पालकांना धमकावलं, मनसेनं दिला मोठा इशारा
Dombivali Euro School Fees Issue
मुंबई:

Dombivali News Today : डोंबिवलीत एका नामांकित युरो शाळेकडून विद्यार्थ्यांच्या फी मध्ये 38 टक्के वाढ करण्यात आली. संबंधित पालकांना फी भरण्यासाठी दबाव टाकला जात होता. पालकांनी मनसे नेते राजू पाटील यांना या संदर्भातील माहिती देत त्यांची व्यथा मांडली.अखेर मनसे कार्यकर्ते शाळेत दाखल झाले.फी वाढ कमी केली पाहिजे, मुलांना पालकांना त्रास देऊ नका असा सज्जड इशारा मनसेने दिला आहे. 

डोंबिवलीनजीक कल्याण ग्रामीणमधील रुणवाल सिटीत युरो ही शाळा आहे. या शाळेत 38 टक्के शालेय फी वाढविण्यात आली आहे. फी भरण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात होता. मुलांना पुस्तके मिळणार नाही. तुमचे प्रवेश रद्द केले जातील अशा प्रकारची धमकी पालकांना दिली जात होती.त्यानंतर पालकांनी त्यांची व्यथा मनसेचे नेते राजू पाटील यांच्याकडे मांडली. 

नक्की वाचा >> Crime News : पतीला  बस स्टँडला भजी आणायला पाठवलं अन् नव्या नवरीनं केलं भयानक कांड

मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले

त्यानंतर शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकारी राहूल कामत,अरुण जांभळे,येागेश पाटील हे कार्यकर्त्यांसह शाळेत दाखल झाले. यावेळी पालकही त्याठिकाणी उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले.फी दरवाढ कशाच्या आधारे केली आहे.त्याची माहिती द्या.फी दरवाढ कमी करण्यात यावी.पालक आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका.हा निर्णय मागे घ्या अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले की,येत्या मंगळवारी पालक, मनसे पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात एक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

नक्की वाचा >> Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com