
रेवती हिंगवे, पुणे: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांची बिहारमध्ये गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. मात्र काल त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलून घेत ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील एका व्यावसायिकाच्या हत्येची खळबळजनक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. घोसी पोलिस स्टेशन हद्दीतील माननपूर गावाजवळ शनिवारी, 12 एप्रिल रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. सोमवार 12 एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. लक्ष्मण साधू शिंदे असे मृत उद्योगपतीचे नाव आहे.
लक्ष्मण शिंदे यांना कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलून घेण्यात आले होते. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा आरोपींकडून उद्योगपतीला मेल आला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती बिहारला गेले होते. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती.
नक्की वाचा - Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचा शोध सुरू
अशातच तीन दिवसांपूर्वी शनिवारी (12 एप्रिल) जहानाबादमधील बंधुगंज एकंगरसराय रस्त्यावर घोसी पोलीस स्टेशन परिसरातील माननपूर गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. जहानाबादच्या घोसी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तो एक बेवारस मृतदेह असल्याचे समजून त्याचे शवविच्छेदन केले, परंतु मृतदेहाची ओळख पटताच पोलीस विभागात खळबळ उडाली.
(नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार)