
शरद सातपुते, प्रतिनिधी
Sambhaji Bhide dog bites : सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाचा चावा घेतला आहे. शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला. शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून संभाजी भिडे घरी जात होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारात कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाचा चावा घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम
संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्रा चावल्याच्या घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला, त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.
नक्की वाचा - Pune Crime : खायला देण्यावरुन सोसायटीत वाद; 12 श्वानांना संपवण्याचा प्लान, तिघे दगावले
त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत. सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याची जाणीव पालिकेला झाली असून महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world