अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोचिंग क्लासचा ऑफिस बॉयने अल्पवयीन मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन त्याचा लैंगिक छळ केला. विकास गायकवाड (35) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा कोचिंग क्लास आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन ते तीन वर्षापासून तो याच कोचिंग क्लास मध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने आठवीत शिक्षण घेत असलेल्या या मुलाला शोरूम मध्ये नेलं आणि त्याचा लैंगिक छळ केला.
नक्की वाचा >> Pune News: 7 लाख खंडणी प्रकरणात पुण्यातील रील स्टार महिला पोलीस सोनाली हिंगेला मोठा दणका, सहकाऱ्यांनाही..
मुलगा आई-वडिलांजवळ रडू लागला अन्..
ऑफिस बॉयने पीडित मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. क्लासला जायला नकार देत असल्याने वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. त्यानंतर मुलानेच हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता.मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉय वर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.