जाहिरात

Pune News: भोंदू खरातचा पैसा पुण्यातल्या 'या' सीएने पांढरा केला? 1000 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होणार!

Pune News : नाशिक येथील बहुचर्चित भोंदू बाबा खरात प्रकरणाशी या कार्यालयाचे थेट धागेदोरे जोडले गेले असून, सुमारे 1000 कोटी रुपयांच्या अवाढव्य काळ्या पैशांची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. 

Pune News: भोंदू खरातचा पैसा पुण्यातल्या 'या' सीएने पांढरा केला? 1000 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होणार!
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अवाढव्य काळ्या पैशांची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. 
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News:  पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या पन्ना चेंबर्समधील एका कार्यालयातून सुरू असलेल्या महाकाय आर्थिक व्यवहारांनी संपूर्ण राज्याच्या तपास यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिक येथील बहुचर्चित भोंदू बाबा खरात प्रकरणाशी या कार्यालयाचे थेट धागेदोरे जोडले गेले असून, सुमारे 1000 कोटी रुपयांच्या अवाढव्य काळ्या पैशांची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणाच्या केंद्रस्थानी पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ललित पोफळे यांचे नाव चर्चेत आले असून, त्यांच्या माध्यमातून झालेल्या मालमत्ता गुंतवणुकीमुळे या गुन्ह्याला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे.

भोंदू बाबा खरात आणि सीए पोफळे यांचे कनेक्शन

या प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीए ललित पोफळे हे केवळ खरात यांचे आर्थिक सल्लागार नव्हते, तर ते गेल्या 5 वर्षांपासून खरात यांच्या ट्रस्टवर विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून कार्यरत होते. भोंदू बाबा खरातचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी पोफळे यांच्याकडे होती. 

या दोघांच्या वैयक्तिक बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचे समोर येत आहे. खरातची सर्व आर्थिक गुपिते आणि व्यवहारांची कागदपत्रे पोफळे यांच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

( नक्की वाचा : Ashok Kharat : 30 वर्षांच्या महिलेचं शोषण आणि 5 नरबळी? अशोक खरातच्या 'त्या' गोळ्यांनी कोर्टात खळबळ )
 

काळ्या पैशांची  गुंतवणूक

खरातच्या माध्यमातून गोळा झालेला अफाट पैसा पांढरा करण्यासाठी आणि त्याची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सीए पोफळे यांनी कल्पकतेचा वापर केल्याचा संशय आहे. या पैशांमधून पुणे, मुंबई, नोएडा आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये महागड्या मालमत्ता (प्रॉपर्टी) खरेदी करण्यात आल्या आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे, खरात हा ललित पोफळे यांच्या मदतीने काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या काळ्या पैशांचीही गुंतवणूक करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यामुळे या प्रकरणात काही मोठे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

( नक्की वाचा : Uddhav Thackeray: 'उद्धवजींच्या स्वभावात राजकारण कमी, कलाकार जास्त'; चक्क फडणवीसांनी केलं भरभरुन कौतुक! )

आयपीओ आणण्याची तयारी आणि....

सीए ललित पोफळे यांचे संबंध केवळ खरातपुरते मर्यादित नसून, त्यांनी देशातील एका अत्यंत बड्या बाबाच्या कंपनीचा आयपीओ (IPO) आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. याच अनुभवाच्या जोरावर ते खरातची स्वतःची कंपनी स्थापन करून तिचाही आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत होते. घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर असलेल्या कार्यालयाचा वापर याच मोठ्या आर्थिक नियोजनासाठी केला जात असल्याचे बोलले जात आहे.

एसआयटीच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष

नाशिकच्या खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील खरा 'बडा मासा' अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. खरातची सर्व आर्थिक नाडी हातात असलेल्या सीए ललित पोफळे यांची सखोल चौकशी एसआयटी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

1000 कोटी रुपयांच्या या संशयास्पद व्यवहारांची पाळेमुळे नेमकी कुठे पोहोचली आहेत, याचा शोध घेणे तपास यंत्रणांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com