4 वर्षांच्या चिमुरड्याने उलटी केली म्हणून प्रियकराने बाळाला संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर चिमुरडा पलंगावरुन पडल्याची खोटी माहिती दिली होती.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यातील बिबेवाडी परिसरातून (Pune Crime News) एक संतापजनक बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या लहानग्या मुलाने रात्री उलटी केली म्हणून तिच्या प्रियकराने चिमुकल्याला इतकं मारलं की, यात त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराकडून चिमुकल्याला जीवे मारलं.

मुलाने उलटी केल्याने आरोपीकडून चिमुरड्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणी चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  1 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणात बिबेवाडी पोलिसांनी आरोपी महेश कुंभारला अटक केली आहे.  

Advertisement

नक्की वाचा - 71 वर्षांच्या पतीचं क्रौर्य, पत्नीच्या नकळत तिच्या शरीराचा व्यापार, 10 वर्षात 72 पुरुषांकडून 92 वेळा शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, महिला तिच्या चार वर्षांच्या चिमुरड्यासोबत प्रियकराच्या घरात राहत होती. गेल्या तीन महिन्यांपासून तिघं एकत्र राहत होते. मात्र त्या दिवशी रात्री प्रेयसीच्या मुलाने जेवण झाल्यानंतर उटली केली. याचा महिलेच्या प्रियकराला राग आला. यानंतर त्याने चार वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर चिमुरडा पलंगावरुन पडल्याची खोटी माहिती दिली होती. मात्र छवविच्छेदनाचा अहवाल समोर झाल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस आला. अखेर पोलिसांनी यावर कारवाई केली असून आरोपी महेश कुंभारला अटक केली आहे.  

Advertisement

Topics mentioned in this article