जाहिरात

71 वर्षांच्या पतीचं क्रौर्य, पत्नीच्या नकळत तिच्या शरीराचा व्यापार, 10 वर्षात 72 पुरुषांकडून 92 वेळा शोषण

वृद्ध महिलेवर 72 पुरुषांनी तब्बल 92 वेळा बलात्कार केला आहे. ज्यापैकी 51 जणांची ओळख पटली आहे.

71 वर्षांच्या पतीचं क्रौर्य, पत्नीच्या नकळत तिच्या शरीराचा व्यापार, 10 वर्षात 72 पुरुषांकडून 92 वेळा शोषण
नवी दिल्ली:

गुन्हेगारीची एक अत्यंत भयावह आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका 71 वर्षी वृद्धाने आपल्या 72 वर्षांच्या पत्नीचे दहा वर्षांपर्यंत अज्ञातांकडून लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा वृद्ध आपल्या पत्नीला अमली पदार्थ देत बेशुद्ध करीत होता. यानंतर तो अनोळखी व्यक्तीना ऑनलाइन संकेतस्थळावर शोधायचा आणि पत्नी बेशुद्धावस्थेत असताना त्यांना बलात्कार करायचा सांगायचा. (Crime News) फ्रान्समधून हा भयावह प्रकार समोर आला. 

ही घटना सप्टेंबर 2020 मध्ये उघडकीस आली. एका शॉपिंग सेंटरमध्ये आरोपी डोमिनिक पी तीन महिलांसोबत अश्लील कृत्य करताना सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केल्यानंतर त्याच्या कम्प्युटरमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये त्याची पत्नी बेशुद्धावस्थेत दिसली. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या वृद्ध पत्नीवर बलात्कार केला जात होता. 

नक्की वाचा - Pune Crime : पुण्यात हॉटस्पॉट दिला नाही म्हणून हत्या; भररस्त्यात चेहरा छिन्नविछिन्न होईपर्यंत ठेचला!

डोमिनिक पी हा फ्रान्सच्या सरकारी वीज कंपनी EDF मधील माजी कर्मचारी आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. तो पत्नीला नशेचं औषध देत तिला बेशुद्ध करीत होता आणि त्यानंतर ऑनलाइन वेबसाइट्सच्या माध्यमातून ग्राहकांना बोलावून पत्नीवर बलात्कार करण्यास सांगत होता. या वृद्ध महिलेवर 72 पुरुषांनी तब्बल 92 वेळा बलात्कार केला आहे. ज्यापैकी 51 जणांची ओळख पटली आहे. या आरोपींचं वयोगट 26 ते 74 मधील आहेत. यामध्ये ड्रायव्हर, फायर ब्रिगेड अधिकारी, कंपनीचा बॉस आणि एका पत्रकाराचाही समावेश आहे. वृद्ध महिलेला नशेच्या औषधांचा ओव्हरडोस दिला जात होता, त्यामुळे ते बराच काळ बेशुद्धावस्थेत राहत होती, असा दावा पीडित महिलेच्या वकिलांनी केला आहे. 

नक्की वाचा - 'Cyber Arrest झालाय' बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!

या घृणास्पद स्थितीबद्दल वृद्धेला तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये माहिती झाली. यानंतर महिलेने न्यायालयाला या प्रकरणातील सुनावणी सार्वजनिक करण्याची मागणी केली. लोकांच्या जागरुकतेसाठी हे आवश्यक असल्याचं तिने यावेळी सांगितलं. या प्रकरणातील आरोपी डोमिनिक पी याने सांगितलं की, तो 9 वर्षांचा असताना एका पुरुष नर्सने त्याचं लैंगिक शोषण केलं होतं. या घटनेचा त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. काही काळाने तोच अशा प्रकारची दुष्कृत्य करू लागला.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Pune Crime Video : एकमेकांकडे बघण्यावरून खून केला, मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात जीवघेणा हल्ला
71 वर्षांच्या पतीचं क्रौर्य, पत्नीच्या नकळत तिच्या शरीराचा व्यापार, 10 वर्षात 72 पुरुषांकडून 92 वेळा शोषण
uttar-pradesh unemployed-man-received-250-crore-gst-bill-details
Next Article
व्हॉट्सअपवर मिळाली नोकरीची ऑफर, कागदपत्रं पाठवली, घरी आलं 250 कोटींचं बिल