Pune Crime : विद्यार्थ्यांमध्ये वाद, पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश शाळेत गोळीबार; धक्कादायक प्रकार

न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर वडगाव मावळमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
विद्यार्थ्यांमधील झालेल्या वादाचं रुपांतर गोळीबारात झालं

सुरज कसबे, प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर वडगाव मावळमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते यांचा चुलत भाऊ वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकतो. त्याने आरोपींच्या भावकीतील एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडले होते. याच कारणावरून आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजीत राजाराम ओवाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी फिर्यादीच्या चुलत भावाला शाळेबाहेरील स्कॉर्पिओमधून घेऊन मारहाण केली. त्यानंतर आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.

एकविरा चौकात गोळीबार

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अक्षय मोहिते आपल्या मित्रांसह एकविरा चौकात बसले असताना आरोपी पुन्हा तिथे आले. आरोपी रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी सौरभ वाघमारे आणि अभिषेक ओव्हाळ स्प्लेंडर मोटरसायकलवर आले. सौरभ वाघमारे याने पिस्तूल काढून अक्षय मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडली, पण ती फायर झाली नाही. राऊंड खाली पडला. त्यानंतर अक्षय मोहिते आणि त्याचे मित्र पळून जात असताना आरोपीने पुन्हा एकदा गोळीबार केला.

Advertisement

नक्की वाचा - Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अक्षय जवळच्या सोसायटीत लपल्याने बचावला. या घटनेनंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली. या पथकांनी तात्काळ कारवाई करत अभिषेक राजाराम ओव्हाळ (वय २८), रणजित बाळासाहेब ओव्हाळ (वय २३), प्रथम सुरेश दिवे (वय २३) या तीन आरोपींना अटक केली आहे. अद्याप एक आरोपी फरार असून वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडल्याने परिसरात शांतता राखली गेली आहे.

Topics mentioned in this article