Pune Crime News : कोयता गँगची दहशत; पोलीस अधिकाऱ्यावरच केला हल्ला

कोयता गँगच्य हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगमधील काही गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड गेले होते.

Advertisement
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पुणे

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळली आहे. कोयता गँगची हिंमत एवढी वाढली आहे की आता त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केला आहे. कोयता गँगने पुण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला चढवला आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोयता गँगच्य हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगमधील काही गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड गेले होते. तिकडे त्यांच्यावर या टोळीने चढवला. दरम्यान रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(नक्की वाचा - CCTV Footage : काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO; धावत्या ट्रेनमधून उतरणारा प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच...)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पुण्याच्या  सय्यदनगर भागातील पेट्रोल पंपाजवळ काही वाहनांचा अपघात झाला होता. या वाहन चालकांमध्ये वाद सुरू होता. त्यातील काही जणांकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

(नक्की वाचा- मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती)

सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे त्या ठिकाणी वाद सोडवण्यासाठी गेले असता त्याच्यावरच या टोळक्याने हल्ला चढवला यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या डोक्यात कोयता लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

Advertisement

रत्नदीप गायकवाड जखमी झाल्यानंतर हे हल्लेखोर पळून गेले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वानवडी पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. 

Topics mentioned in this article