Pune News: लिफ्ट मागणे पडले महागात, पिस्तुल दाखवून महिलेवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?

Pune News:पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News: पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
दौंड, पुणे:

Pune News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कुरकुंभ परिसरात एका 32 वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून, तिच्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित महिलेने धाडसाने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

ही धक्कादायक घटना 25 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. मुकादमवाडी कुरकुंभ हद्दीतून जात असलेल्या पीडित महिलेला आरोपीने मदतीचा आव आणत लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. महिला गाडीत बसल्यानंतर आरोपीने आपले खरे रूप दाखवले. त्याने महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपीने हे नीच कृत्य केले आणि तिथून पळ काढला.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणच्या बड्या डॉक्टरांची तिजोरी कुणी फोडली? दीड वर्षानंतरही चोर मोकाट, KDMC महासभेत मोठा राडा )

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी खडकी येथील संशयित आरोपी अमोल साहेबराव काळे याला अटक केली आहे. आरोपीने हा गुन्हा का केला आणि त्याच्याकडे पिस्तूल कोठून आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस स्वतः करत आहेत. अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये काळजीचं वातावरण आहे.

Topics mentioned in this article