
पुणे येथे नोकरी करत असलेल्या 24 वर्षीय साईनाथ काकडच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कोपरगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका इंस्टाग्रामवरील वादग्रस्त मेसेजमुळेच या प्रकरणाला जीवघेणं वळण मिळाल्याचं पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन समोर आलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात साईनाथ हा मृच अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय निर्माण केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साईनाथ काकड यांच्या भावानं कोपरगाव पोलीसात दिलेल्या फिर्यादी नंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. साईनाथ काकड हा पुण्यात नोकरी करत होता. शिवाय तो पुण्यातच राहात होता. त्यावेळी त्याची ओळख रुपाली नामक तरुणीशी झाली होती. यानंतर साईनाथने रुपालीच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर शिवीगाळ केल्याच्या रागातून रुपाली आणि तिच्या इतर चार साथीदारांनी मिळून साईनाथचे पुण्यातून अपहरण केलं.
ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट
त्यानंतर त्याला कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावात आणले. तिथेच साईनाथला मारहाण करण्यात आली. त्याला काही विषारी पदार्थ दिल्याचा संशय ही साईनाथच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर साईनाथच्या वडिलांना फोन करून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती दिली. साईनाथला तातडीने शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी मृत साईनाथचा भाऊ महेश काकड याने कोपरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. अशी माहिती कोपरगावचे पोलिस निरिक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे. या खूनाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world