सुरज कसबे, पुणे: नोकरी मिळत नसल्याने मेकॅनिकल इंजिनिअरने चक्क वाहनांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. याप्रकरणी मॅकेनिकल इंजिनियर तरुणासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल 53 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी पोलिसांनी तीन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक करत तब्बल 26 लाख 10 हजार रूपये किंमतीच्या 53 दुचाकी जप्त केल्यात, धक्कादायक बाब म्हणजे यातील एक चोरटा मेकॅनिकल इंजिनिअर असून नोकरी मिळत नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धीरज प्रदीप सावंत अस या उच्चशिक्षित चोरट्याचे नाव असून त्याने काम मिळत नसल्याने त्याचे साथीदार आरोपी संतोष मारुती शिंदे व बालाजी तात्यासाहेब भोसले यांच्या सोबत मिळून एक दोन नव्हे तब्बल 53 दुचाकी चोरी केल्याचं कबूल केलं आहे. पिंपरी पोलिसांनी 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे माहिती घेत या आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला
आरोपी चोरीच्या दुचाकी हे कमी किंमतीत धाराशिव, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात विकत असल्याचं देखील पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या आरोपींच्या अटकेन पिंपरी चिंचवड, पुणे , कोल्हापूर ,सातारा या ठिकाणी नोंद असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.