रेवती हिंगवे, पुणे:
Pune Warje Style Murder Mystery: पुणे शहरात घडलेल्या दृश्यम स्टाईल हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिक्षिका पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिची हत्या केली. खून केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला.त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास पोहचला.मात्र पोलिसांसमोर त्याचे बिंग फुटले आणि दृष्टमस्टाईल खुनाचा उलगडा झाला.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर जाधव हा आरोपी फॅब्रिकेशन काम करतो मूळचा अमरावती रहिवासी पुण्यात शिवणे परिसरात राहिला होता. 2017 ला त्याचे अंजलीशी लग्न झाले. लग्नानंतर दोघांना एक मुलगा एक मुलगी असे दोन मुले आहेत. एक तिसरी आणि एक पाचवी अशी मुलं शिकत आहेत, मुल दिवाळी सुट्टीमुळे ते गावाला गेले होते. आरोपीचेच एका महिलेशी अनैतिक संबंध होते, तरी त्याने बायकोवर आरोप केले होते.
यासाठी त्याने एका मित्राला बायकोच्या मोबाईलवर आय लव यु चा मेसेज केला आणि त्यालाही आरोपीने रिप्लाय दिला.यावरून बायको संशय घेत होता, याच वादातून त्याने पत्नीची हत्या करायचे ठरवले. हत्येआधी आरोपीने दृश्यम चित्रपट तब्बल पाच वेळा पाहिला. त्यानंतर खेड शिवापूर जवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. 26 ऑक्टोबरला घेऊन चार चाकी गाडी घेऊन बायकोला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला.
हत्या केली, भट्टीत मृतदेह जाळला..
त्याच ठिकाणी बायकोचा गळा दाबून खून केला,आणि त्या ठिकाणी भट्टी केली होती त्यात मृतदेह राख जवळ असलेल्या वड्यात नदीत फेकून दिली.त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याचे तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला असता त्यानेच हे केलं असल्याचे सिद्ध झाले. मिसींगचा तपास करताना पोलिसानी सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून तपास केला.
CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली
मिसींग दाखल झाल्यानंतर मिसींग महीलेचा तक्रारदार पती हा वारंवार पोलीस ठाणेस येवुन माझ्या पत्नीला कधी शोधणार याबाबत आत्मीयतेने चौकशी करत होता. त्यामुळे तक्रारदार पती याच्या हालचाली, मिसींग महीला मिसींग झाल्याचे दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी गुन्हा उघड केला. आरोपी विरुध्द वारजे माळवाडी पोलीस गुन्हा दाखल करुन राजगड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे.