जाहिरात

CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली

ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला आपला चेहरा ओढणीने झाकून ग्राहक म्हणून शिरली. ती काही क्षण दुकानात थांबली आणि संधी मिळताच, तिने दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला.

CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली
  • A woman who entered jewellery shop in Gujarat with the intention of robbing it ended up being slapped 20 times
  • The woman threw chilli powder into the shopkeeper's eyes in an attempt to rob him
  • Police officials said the shopkeeper has declined to file a complaint regarding the incident
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

अहमदाबादमधील एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या एका महिलेला दुकानदाराच्या सावधगिरीमुळे चांगलाच धडा मिळाला आहे. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  दुकानदाराने महिलेला अवघ्या 25 सेकंदांत तब्बल 20 वेळा थोबाडीत मारून बाहेर हाकलून दिल्याचे दिसत आहे. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

नेमके काय घडले?

व्हिडीओत दिसत आहे की, ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला आपला चेहरा ओढणीने झाकून ग्राहक म्हणून शिरली. ती काही क्षण दुकानात थांबली आणि संधी मिळताच, तिने दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिला चोरी करता येईल.

मात्र, तिचा प्लॅन फसला, कारण फेकलेली मिरची पूड दुकानदाराच्या डोळ्यांपर्यंत पोहोचली नाही. महिलेचा चोरीचा हेतू लक्षात येताच दुकानदाराने त्वरित जागेवरून उठून तिला थोबडवून काढलं. त्याने 25 सेकंदांमध्ये तिला जवळजवळ 20 चापट मारल्या. त्यानंतर तो काउंटरवरून उडी मारून खाली उतरला आणि तिला मारतच दुकानाबाहेर नेले. या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुकानदाराचा तक्रार देण्यास नकार

या घटनेनंतर दुकानदाराने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. या महिलेला मारहाण केल्यामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने त्याने तक्रार देण्यास नकार दिला असावा.

पोलिसांकडून स्वतःहून तपास सुरू

अहमदाबाद पोलिसांनी 'X' वर निवेदन जारी करत म्हटले आहे की, "या प्रकरणात तक्रारदाराला वैयक्तिकरित्या दोनदा भेटून निवेदन घेण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. परंतु तक्रारदार व्यावसायिक कोणताही गुन्हा दाखल करण्यास उत्सुक नाहीत. तरीही, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com