जाहिरात

Pune Gangwar News: जेलमधून फिल्डिंग? धो- धो पावसात रक्त सांडलं, गणेश काळे मर्डरचे आंदेकर कनेक्शन!

Pune Gangwar Ganeh Kale Murder Vanraj Andekar Gang Connection: भरपावसात रक्ताचे पाट वाहिल्यासारखी अगदी सिनेस्टाईल हत्या पुण्यात घडली. या हत्येचेही थेट आंदेकर टोळीशी कनेक्शन आल्याने खळबळ उडाली आहे. 

Pune Gangwar News: जेलमधून फिल्डिंग? धो- धो पावसात रक्त सांडलं, गणेश काळे मर्डरचे आंदेकर कनेक्शन!

रेवती हिंगवे, प्रतिनिधी:

Pune Gangwar Ganesh Kale Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर टोळी सध्या जेलमध्ये आहे. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवणाऱ्या बंडू आंदेकर टोळीचा नायनाट करण्याचा निर्धार पुणे पोलिसांनी केला. आंदेकर टोळीची कोंडी झाल्यानंतर पुण्यातील गँगवॉर कमी झाले असा सर्वांचा कयास होता. मात्र शनिवारी आणखी एका हत्येने पुणे शहर पुन्हा हादरले. भरपावसात रक्ताचे पाट वाहिल्यासारखी अगदी सिनेस्टाईल हत्या पुण्यात घडली. या हत्येचेही थेट आंदेकर टोळीशी कनेक्शन आल्याने खळबळ उडाली आहे. 

भरपावसात पाठलाग करत हत्या... 

शनिवारी घडलेल्या सिनेस्टाईल हत्येने पुणे शहर पुन्हा एकदा हादरुन गेले.  पुण्यातील कोंढव्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे. गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी पावने चार वाजताच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार आले. 

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अमन मेहबूब शेख , अरबाज अहमद पटेल, यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हत्येनंतर चारही आरोपी खेड शिवापुर इथल्या दर्ग्याजवळ लपले होते. या गुन्ह्यात वापरलेले पिस्टल आणि इतर हत्यारेही जप्त करण्यात आली आहे. 

Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

आंदेकर टोळीने घेतला बदला? Andekar Gang Connection

हत्या झालेला गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. समीर काळे याने वनराज आंदेकरच्या हत्येत महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोमकर तसेच सोमनाथ गायकवाड यांना वनराज आंदेकरच्या हत्येसाठी वापरलेली  मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. त्यामुळे ही हत्या गँगवॉर आणि वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

जेलमधून सुत्रे हलली....? 

धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने कृष्णा आंदेकरची भेट घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कृष्णा आंदेकरने जेलमधून सुत्रे हलवली का? आंदेकर फॅमिली आतमध्ये असली तरी टोळी सक्रीय आहे का? असाही संशय आता व्यक्त होत आहे.  दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गणेशविसर्जनाच्या पुर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खून झाला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवार तर भडकले नाही ना असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Ayush Komkar Case: भयंकर सूडचक्र! एक मर्डर अन् अख्खं कुटुंब तुरुंगात, पुण्याच्या गँगवॉरची हादरवणारी STORY

Listen to the latest songs, only on JioSaavn.com